लिएंडर पेस विरोधात कौटुंबिक हिंसा खटला दाखल, rhea pillai files case against leander paes of domestic

लिएंडर पेस विरोधात कौटुंबिक हिंसा खटला दाखल

लिएंडर पेस विरोधात कौटुंबिक हिंसा खटला दाखल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मॉडेल रिया पिल्लईने टेनिस खेळाडू आणि आपल्या पूर्वीच्या लिव्ह इन रिलेशनच्या साथीदार लिएंडर पेसच्या विरोधात कौटुंबिक हिंसा आणि छळवणूक संबंधी तक्रार नोंदविली आहे.

मुंबईच्या स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला असून तक्रारीविरोधात रियाने पेसच्या वडिलांना सुद्धा दोषी बनवले आहे.

पेसचे वकील परवेज मेननच्या मते, त्याचे वडिल वेस पेसच्या विरोधात कौटुंबिक हिंसा प्रकरणी तक्रार केली आहे. दर महिना चार लाख रुपयांची पोटगीही मागितली आहे. यासंबंधीची सुनावणी 30 जूनला होण्याची शक्यता आहे.

याआधी दोघे ही आपली आठ वर्षाची मूलीची कस्टडी मिळवण्यासाठीही खटला चालवला होता.

पिल्लईनी आपल्या तक्रारीत पेसचे वडिलांनी कार्टर रोडच्या घरी तिला आणि तिच्या मुलीला येण्यास बंदी घातली होती आणि त्यांच्या संपत्तीला तिसऱ्या पक्षाच्या हातात सोपविण्यास विरोध केला आहे.

आपल्या मुलीची स्थायी कस्टडीसाठी पेसने गेल्या महिन्यात कौटुंबिक न्यायालयाल पालकत्व याचिका दाखल केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 23, 2014, 11:08


comments powered by Disqus