मॉडेलसोबत अफेयर, रोनाल्डो अडचणीत, Ronaldo Affair with model

मॉडेलसोबत अफेयर, रोनाल्डो अडचणीत

मॉडेलसोबत अफेयर, रोनाल्डो अडचणीत
www.24taas.com, झी मीडिया, ब्रार्सिला

फुटबॉलच्या मैदानातील सुपरस्‍टार खेळाडू क्रि‍स्‍टीनो रोनाल्‍डो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुलींच्या नेहमीच गराड्यात असणारा रोनाल्डो हा मुलींच्या हृद्यावर नेहमीच राज्य करतो. पण यावेळेस मात्र तो चांगलाच वादात सापडला आहे. ब्राझीलच्या एका मॉडेलसोबत असलेल्या शारीरि‍क संबंधामुळे अडचणीत व वादात सापडला आहे. आता एका ब्राझीलियन मॉडेलसोबत त्याचे संबंध असल्याने खळबळ उडाली आहे.

एंड्रेसा उरेच या २७ वर्षीय ब्राझीलियन मॉडेलने नुकतेच मॉडेलिंग स्पर्धेत मिस बमबम हा किताब पटकावला. त्यानंतर तिने लंडनमधील वृत्तपत्र `द सन`ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, फुटबॉल स्‍टार रोनाल्‍डोसोबत माझे अफेयर आहे. याचबरोबर रोनाल्डो आणि आपण कसे भेटलो व एकमेंकाकडे कसे आकर्षित झालो, याबाबतही सांगितले.

एंड्रेसासोबत शरीरसंबंध ठेवताना रोनाल्डोने आपली रशियन गर्लफ्रेंड आणि सुपरमॉडेल इरीना शायक हिलाही अंधारात ठेवले.

First Published: Thursday, May 2, 2013, 15:38


comments powered by Disqus