सचिनची फूटबॉल टीम... केरळ ब्लास्टर्स!, sachin tendelkar names football team kerala blasters

सचिनची फूटबॉल टीम... केरळ ब्लास्टर्स!

सचिनची फूटबॉल टीम... केरळ ब्लास्टर्स!

www.24taas.com, झी मीडिया, केरळ

भारतीय क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनं `इंडियन फुटबॉल सुपर लीग`मध्ये (आयएफएसएल) आपल्या टीमला नवीन नाव बहाल केलंय.

कोच्ची फ्रेंचायजीच्या टीमला मास्टर ब्लास्टरनं आपल्या रंगात रंगवत `केरळ ब्लास्टर्स` असं नाव दिलंय.

आयएफएसएलमध्ये कोच्ची टीमचा सहमालक असलेल्या सचिननं तिरुअनंतरपुरममध्ये मंत्रालयात जाऊन केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांची भेट घेतली. त्यानंतर सचिननं आपल्या टीमच्या या नव्या नावाची घोषणा केलीय.

यावेळी, ओमन चंडी यांनी सचिनला पुढच्या वर्षी केरळमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय खेळांच्या 35 व्या सत्रात सद्भाव राजदूत बनण्याचा प्रस्तावही पुढे केला. सचिननं त्यालाही होकार दिलाय. त्यामुळे आपला लाडका सचिन आता `सद्भाव राजदूत` म्हणूनही पुढे येणार आहे.

केरळ विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी भारतरत्न सचिनचं पुढे येऊन फुटबॉलच्या प्रचारासाठी प्रयत्न करण्यासाठी कौतुक केलं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 27, 2014, 20:39


comments powered by Disqus