Last Updated: Sunday, October 21, 2012, 22:21
www.24taas.com, उदेन्सी, डेन्मार्क भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालनं आपला शानदार फॉर्म कायम ठेवत डेन्मार्क ओपनवर ताबा मिळवलाय. डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरी सायनानं जर्मनीच्या ज्युलियन शेंकवर मात मिळवत सायनानं डेन्मार्क ओपन सुपर सीरीज बॅडमिंटन टूर्नामेंटची महिला एकेरी स्पर्धा आपल्या नावावर केलीय.
लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि टूर्नामेंटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सायनानं रविवारी खेळल्या गेलेल्या महिला एकेरी स्पर्धेत बाजी मारली. तिन जर्मनीच्या ज्युलियनला २१ - १७ आणि २१ - ८ अशा सलग सेटमध्ये ज्युलियनला केलं पराभूत केलं.
याअगोदर शनिवारी, सेमीफायनलमध्ये सायनासमोर अव्वल मानांकित चीनच्या यिहान वँगचे आव्हान होते. पण, दुस-या गेममध्ये १२-२१, ७-१२ अशा पिछाडीवर असताना दुखापतीमुळे यिहानने माघार घेतली. आणि सायनाचा अंतिम फेरीचा मार्ग मोकळा झाला होता.
First Published: Sunday, October 21, 2012, 22:21