Last Updated: Monday, April 15, 2013, 10:53
www.24taas.com, नवी दिल्ली पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिक यांच्याशी लग्न केल्यानंतर पाकिस्तानची झालेली सून सानिया मिर्झा हिची भारतीय टेनिसपटू संघटनेच्या (आयटीपीए) उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
सानियाचे लग्न झाले तरी ती भारताकडून खेळत आहे. ती भारताची आघाडीची महिला टेनिसपटू आहे. सानिया हिची आयटीपीए उपाध्यक्षपदी निवड झाल्याने तिचे ट्विटर अभिनंदन करण्यात येत आहे.
सानियाबरोबरच लिअँडर पेस, महेश भूपती आणि सोमदेव देववर्मन हे सुद्धा या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. आयटीपीएचे सचिव कार्ती पी. चिदंबरम यांनी याबाबत माहिती दिलेय. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून सानियाचे अभिनंदनही केलेय. आयटीपीए या संघटनेचे जयदीप मुखर्जी हे अध्यक्ष आहेत.
First Published: Monday, April 15, 2013, 10:53