यूएस ओपन: सानिया मिर्झा डबल्सच्या सेमिफायनलमध्ये Sania-Zheng in semis of US Open

यूएस ओपन: सानिया मिर्झा डबल्सच्या सेमिफायनलमध्ये

यूएस ओपन: सानिया मिर्झा डबल्सच्या सेमिफायनलमध्ये
www.24taas.com , झी मीडिया, न्यूयॉर्क

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतल्या महिला डबल्समध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं चीनच्या जी झेंगसोबत मिळून सेमिफायनल्समध्ये प्रवेश मिळवलाय.

सानिया-झेंग जोडीनं चौथं मानांकन प्राप्त असलेल्या चीनच्या शुआई पेंग आणि तैवानच्या शू वे शिय या जोडीचा ६-४, ७-६ असा दोन सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये ६-४ असा सहज विजय मिळविल्यानंतर सानिया-झेंगला दुसऱ्या सेटमध्ये कडवी झुंज मिळाली. पण, या दोघींनीही संयम दाखवत प्रतिस्पर्ध्यांची सर्व्हिस ब्रेक करत पॉईँट मिळविला आणि सेटही जिंकला. दुसरा सेट टायब्रेकरमध्ये या जोडीनं ७-५ असा जिंकला.

स्पर्धेत याआधी भारताचा टेनिसपटू लिअँडर पेसनं रोडेक स्टेपनाकच्या साथीनं पुरूष डबल्सच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आता दहाव्या मानांकित सानिया मिर्झा-झेंग या जोडीनंही सेमिफायनल गाठलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 5, 2013, 15:01


comments powered by Disqus