ऑस्ट्रेलियन ओपन: सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिकाSerena Williams, Maria Sharapova stumble; leave wo

ऑस्ट्रेलियन ओपन: सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका

ऑस्ट्रेलियन ओपन: सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ऑस्ट्रेलियन ओपनमधून सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका कायम आहे. तिसऱ्या मानांकित मारिया शारापोव्हाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधून पॅकअप झालं आहे. शारापोव्हाला स्लोव्गाकियाच्या २० मानांकित डॉमिनिका सिबुलकोव्हानं ३-६, ६-४, ६-१नं धुव्वा उडवला.

रशियन ब्युटी शारापोव्हानं पहिला सेट जिंकला होता. त्यामुळं शारापोव्हा सहज क्वार्टर फायनल गाठेल अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांना होती. मात्र तसं काहीच घडल नाही. सिबुलकोव्हानं दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये जबरदस्त खेळ करत क्वार्टर फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केला.

तर अव्वल सीडेड सेरेना विल्यम्सलाही सर्बियाच्या ऍना इव्हानोविचकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागाला होता. सेरेना आणि शारापोव्हाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधून पॅक झाल्यानं टेनिसप्रेमींना चांगलाच धक्का बसलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 20, 2014, 13:10


comments powered by Disqus