अंडर २० महिला हॉकी टीममधील `सेक्स`कांड Sex scandal in Under 20 ladies Hockey team

अंडर २० महिला हॉकी टीममधील `सेक्स`कांड

अंडर २० महिला हॉकी टीममधील `सेक्स`कांड
www.24taas.com, नवी दिल्ली

जम्मू आणि काश्मीरच्या अंडर २० महिला हॉकी खेळाडूंनी आपले प्रशिक्षक अंगद सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रशिक्षक अंगद सिंग यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. २८ जानेवारीपर्यंत अंगद सिंग यांना तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.

अंगद सिंग यांच्या विरोधात पंजाबच्या पाच महिला खेळाडूंनी तक्रार केली होती. अंगद यांच्यावर आयपीसी कलम ३५४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० जानेवारी रोजी हैदराबाद येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल होणाऱ्या जम्मू आणि काश्मीरच्या टीमचं अंगद सिंग यांनी लैंगिक शोषण केलं. हाजरत निझामुद्दिन ते हैदराबादपर्यंत चाललेल्या प्रवासात अंगद यांनी पाच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे.

यापूर्वीही हॉकी प्रशिक्षक एम के कौशिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता. टीमची माजी कर्णधार रंजिताने टीममध्ये जागा मिळवण्यासाठी लैंगिकतेची मागणी केली जात असल्याचे आरोप केले होते. कौसिक यांचे कॅनडामध्ये वेश्यांसोबतचे अश्लील फोटोदेखील प्रकाशित झाले होते.

First Published: Thursday, January 17, 2013, 17:00


comments powered by Disqus