शाहरुखला हवीय आता कोलकाता फुटबॉल टीम!, Shahrukh Khan want to Purchase Kolkata football franchise

शाहरुखला हवीय आता कोलकाता फुटबॉल टीम!

शाहरुखला हवीय आता कोलकाता फुटबॉल टीम!
www.24tass.com , झी मीडिया, मुंबई

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक अभिनेता शाहरुख खानला आता फुटबॉल टीमच्या कोलकाता फ्रेंचाईसीची खरेदी करण्याची इच्छा आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि आएमजी-रिलायंसची आयपीएल स्टाईल नव्या लीगची कोलकाता फ्रेंचाईसी शाहरुखला हवीय.

गोव्यातील आय लीग क्लब डेम्पोत शाहरुख भागिदारी विकत घेणार होता. मात्र आता नवी लीग येत आहे तर, तो कोलकाता फ्रेंचाईसी विकत घेण्याचा विचार करतोय.

आयपीएलच्या धर्तीवरील 18 जानेवारीपासून फूटबॉल लीग सुरू होणार आहे. नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर उद्‌घाटनाचा सामना होणार आहे. या लीगमध्ये मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, कोची, गोवा, दिल्ली आणि बंगळूरु या आठ शहरांचे फ्रेंचाईस असतील तर गुवाहाटी आणि हैदराबाद या शहरांना राखीव ठेवण्यात आलं आहं. आएमजी रिलायंस प्रवर्तक असलेली ही लीग 30 मार्चपर्यंत रंगणार आहे.

आठ शहरांच्या फ्रेंचाईजीसाठी पुढील महिन्यात बोली लागेल तर ऑक्टोयबर महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या खेळाडूंमध्ये भारतीयांबरोबर परदेशी खेळाडूही असणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 6, 2013, 09:28


comments powered by Disqus