फ्रेंच ओपनची मारिया शारापोव्हा विजेती, Sharapova floors Halep to win second French Open title

फ्रेंच ओपनची मारिया शारापोव्हा विजेती

फ्रेंच ओपनची मारिया शारापोव्हा विजेती
www.24taas.com, वृत्तसंस्था, पॅरिस

फ्रेंच ओपन 2014 च्या महिलांच्या अंतिम सामन्यात रशियाच्या सातव्या मानांकित मारिया शारापोव्हाने रुमानियाच्या चौथ्या मानांकित सिमोना हालेपचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं.

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मारिया शारापोव्हाने चांगला खेळ केला. हे शारापोव्हाचं पाचवं ग्रँडस्लॅम जेतेपद तर दुसरं फ्रेंच जेतेपद आहे.

शारापोव्हाने हालेपचा 6-4, 6-7, 6-4 असा पराभव केला. याआधी मारियाने 2012 साली ही स्पर्धा जिंकली होती. तर हालेप आपल्या पहिल्याच ग्रँडस्लॅम फायनलमध्ये खेळत होती. पहिल्या सेटमध्ये मारियाने वर्चस्व गाजवल्यानंतर दुसरा सेट चुरशीचा झाला. टायब्रेकमध्ये हा सेट जिंकत हालेपने सामन्यात चांगलीच चुरस आणली.

मात्र मारियाच्या जोरदार ग्राऊंडस्ट्रोक्सना हालेपकडे उत्तर नव्हते. शेवटी तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर मारियाने विजेतेपदला गवसणी घातली.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 7, 2014, 22:21


comments powered by Disqus