नेमबाजीला काळीमा, खेळाडू सापडले सेक्स करताना, Shooter sex in sports camp

नेमबाजीला काळीमा, खेळाडू सापडले सेक्स करताना

नेमबाजीला काळीमा, खेळाडू सापडले सेक्स करताना
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

महिला हॉकी सेक्स स्कॅण्डलनंतर राष्ट्रीय नेमबाज शिबीरात सेक्स करताना दोन खेळाडूंना पकडण्यात आलं आहे. आयपीएल फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेटचे नाव खराब होत असताना आता नेमबाजीच्या खेळाला ह्या दोन खेळाडूंनी अशा प्रकारे बट्टा लावला आहे.

पुण्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबीरामध्ये एका नेमबाजाला सहकारी महिला खेळाडूसोबत एकाच खोलीत पकडण्यात आले आहे. पकडण्यात आलेले दोन्ही खेळाडू झारखंडमधील आहेत. ही घटना पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) येथे सुरू असलेल्या शिबीरादरम्यान घडली आहे. या घटनेबद्दल एकही अधिकारी किंवा खेळाडू बोलण्यास तयार नाही.

येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शिबीरात एका पुरुष नेमबाज खेळाडूला सहकारी महिला खेळाडूच्या रुममध्ये सेक्स करताना पकडण्यात आले. या वृत्ताला नेमाबाज संघटनेचे कोषाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ही घटना अतिशय लाजिरवाणी आहे. हे दोघेही महिला खेळाडूच्या रुममध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळले. त्यानंतर दोघांनाही एएसआय आणि भारतीय नेमबाज संघटनेनी आपापल्या स्तरावर शिक्षा केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 7, 2013, 14:29


comments powered by Disqus