Last Updated: Thursday, January 16, 2014, 12:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमायकल शूमाकर हा फॉर्म्युला वनचा बादशाह आयुष्यभर कोमातच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर्मनीच्या न्यूज पेपर्समध्ये अशा प्रकारच्या बातम्या आज झळकल्या आहेत.
जर्मनीतील काही तज्ज्ञ डॉक्टरांनी ही भीती व्यक्त केली आहे. मात्र मायकल शूमाकर यांच्या फॅन्सना शूमाकर कायम कोमात असेल ही कल्पना सहन होत नाहीय.
शूमाकरचा मागील महिन्यात आल्प्स पर्वतरांगांमध्ये बर्फावर स्कीईंग करतांना अपघात झाला होता. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर शूमाकर हा १७ दिवसांपासून व्हेंटीलेटरवर आहे. अपघातात शूमाकरला झालेली जखम, ही गंभीर स्वरूपाची असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
व्हेंटिलेटरवर जास्तच जास्त १४ ते १५ दिवस ठेवलं जातं, मात्र त्यानंतर शूमाकर कोमातून बाहेर न आल्यानं चिंता व्यक्त केली आज आहे. काहीतरी चमत्कार होईल आणि शूमाकर कोमातून बाहेर येईल, असं शूमाकरच्या फॅन्सना भाबळी आशा आहे.
शूमाकरवर फ्रान्समधील ग्रेनोबेल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रूग्णालयातील डॉक्टरांनी शूमाकरच्या प्रकृतीवर काहीही बोलणं टाळलं असल्याने, शूमाकरच्या प्रकृतीची चिंता अधिकच वाढली आहे. हॉस्पिटलबाहेर फ्रान्स मीडियाने गर्दी केली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 16, 2014, 12:06