‘तळवलकर क्लासिक’मध्ये बॉडी बिल्डर्सचा थरार... ,Talwalkar Classic thrills in the body bildarsaca ...

‘तळवलकर क्लासिक’मध्ये बॉडी बिल्डर्सचा थरार...

‘तळवलकर क्लासिक’मध्ये बॉडी बिल्डर्सचा थरार...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील रसिकांना पुन्हा एकदा एकाच मंचावर भारतातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठवपटू पाहण्याचे भाग्य लाभत आहे. व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ‘तळवलकर क्लासिक’ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.

या स्पर्धेतील प्राथमिक फेरीला आजपासून सुरूवात झाली. उद्या म्हणजेच बुधवारी पहिल्या फेरीतील विजयी १० शरीरसौष्ठवपटूंमध्ये यशवंतराव नाट्यगृहात स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत जगज्जेत्या, आशियाई विजेत्या खेळाडूंनीह सहभाग नोंदविलाय.

स्पर्धेच्या पुरस्कार वितरणासाठी वयाची शंभरी गाठणारे माजी मि. युनिव्हर्स मनोहर ऐच आणि शरीरसौष्ठवातील आदर्श प्रेमचंद डोग्रा उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेचं वैशिष्ठ्यं म्हणजे, भारतात शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दहा लाख रुपयांची रोख बक्षिसे खेळाडूंना दिली जाणार आहेत. विजेता ३ लाखांचा तर उपविजेता २ लाखांचा मानकरी ठरेल. तिसर्या क्रमांकाचा खेळाडूही लखपती होणार असून अन्य सात खेळाडूही भरघोस पुरस्कारांचे मानकरी ठरतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्वोत्तम पोझरला ५० हजारांचे इनाम दिले जाणार आहे.

First Published: Tuesday, November 26, 2013, 21:05


comments powered by Disqus