टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला पितृशोक, Tennis player Steffi Graf`s father dies

टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला पितृशोक

टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला पितृशोक
www.24taas.com, वृत्तसंस्था, मॅनहेईम

जर्मनीची जगप्रसिद्ध टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिचे वडील पीटर (७५) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता.

पीटर टेनिस प्रशिक्षक होते, तसेच कार विक्री व विम्याचाही त्यांचा व्यवसाय होता. त्यांनी स्टेफीला तीन वर्षांची असतानाच टेनिस शिकविण्यास सुरवात केली. स्टेफीचे ते व्यवस्थापकही होते. स्टेफीला नंतर पावेल स्लोझील यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, स्टेफीच्या कारकिर्दीच्या मध्यास पीटर यांना कर चकविल्याच्या कारणावरून १९९७ मध्ये अटक झाली. त्यांना ४५ महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला.

स्टेफी पती आंद्रे अगासी व मुलांसह अमेरिकेत राहते. आजारी वडिलांना भेटण्यासाठी ती सहा दिवसांपूर्वी जर्मनीत आली होती आणि त्यानंतर ती परत गेली. स्टेफीने १२ आणि १८ वर्षांखालील युरोपीय विजेतेपद जिंकून कारकीर्द सुरू केली. नंतर तिने मार्टिना नवरातिलोवा, ख्रिस एव्हर्ट या मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना हरविले. १९८७ मध्ये फ्रेंच ओपन जिंकून तिने पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले. स्टेफीने देदीप्यमान कारकिर्दीत २२ ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 14:50


comments powered by Disqus