टेनिसमध्ये युकी भांबरीचा पहिला नंबर - Marathi News 24taas.com

टेनिसमध्ये युकी भांबरीचा पहिला नंबर

www.24taas.com, नवी दिल्ली
 
मागच्या आठवड्यात उजबेकिस्तानात झालेली चॅलेंजर टूर्नामेंट जिंकून युकी भांबरी भारतातला नंबर एकचा टेनिस खेळाडू बनलाय. युकीची ही आपल्या कार्यकालातील पहिलीच टूर्नामेंट होती. फायनलमध्ये इस्राईलच्या आमिर वेनट्राबचा ६-३, ६-३ असा पराभव करत भांबरीनं ७९व्या स्थानावर उडी मारलीय.
 
एटीपीनं नुकत्याच केलेल्या विश्व रँकिंगमध्ये युकी भांबरी २१८ व्या स्थानावर तर भारतातल्या खेळाडूंमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान झालाय. २२७ रेटिंग गुण प्राप्त करून तो सोमदेव देववर्मनपेक्षा वरच्या १४व्या स्थानावर पोहचलाय. सोमदेव दुखापतीच्या कारणावरून मागच्या काही दिवसांपासून टेनिसकोर्टच्या बाहेरच आहे. त्यामुळे त्याची रँकिंग सतत घसरतच चाललीय.
 
दोन टप्पे खाली घसरूण सोमदेव २३२ व्या स्थानावर आहे. दरम्यान, विष्णुवर्धन यानंही वरच्या स्थानावर झेप घेत ३५७ वं स्थान पटकावलंय. याच दरम्यान युगल रँकिंगमध्ये लिएंडर पेस सातव्या तर रोहन बोपन्ना १२ व्या स्थानावर कायम आहेत. महेश भूपतिनं एक पायरी वर चढत १३ वं स्थान पटकावलंय.
 

First Published: Wednesday, May 23, 2012, 10:38


comments powered by Disqus