Last Updated: Wednesday, May 30, 2012, 10:36
www.24taas.com, मॉस्को 
वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये विश्वनाथन आनंद आणि इस्त्रायलच्या बोरिस गेलफंड यांच्यातील १२ वा गेमही बरोबरीत सुटला. त्यामुळे दोघांचेही प्रत्येकी ६ पॉईंट्स झाले आहेत. आता शेवटचा गेम बरोबीरत सुटल्यानं वर्ल्ड चॅम्पियनशिपचा निर्णय हा टायब्रेकरमध्ये होणार आहे.
गेलफंड आणि आनंदमध्ये दोन टायब्रेकर खेळवण्यात येणार आहेत. या टायब्रेकरमध्ये आनंदला अडीच गुण मिळवणे आवश्यक आहे. आता वर्ल्ड चेस चॅम्पियन कोण होणार याचा निर्णय टायब्रेकरवर ठरणार आहे. आनंद रॅपिड गेममध्ये मास्टर आहे त्यामुळे त्याला हॅट्ट्रिक साधण्याची नामी संधी आहे.
आनंदने टायब्रेकरमध्ये विजय मिळविल्यास वर्ल्ड चेस चॅम्पियनशीपचा माळ तिसऱ्यांदा गळ्यात पडू शकते. आनंद देखील त्याच प्रयत्नात असणार हे मात्र नक्की.
First Published: Wednesday, May 30, 2012, 10:36