Last Updated: Thursday, May 31, 2012, 18:15
www.24taas.com, पॅरिस भारताचा लिएंडर पेस आणि रुसची एलीना वेस्नीना तसचं महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोड्यांनी वर्षातल्या दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी स्पर्धेतल्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलाय.
पहिल्या टप्प्यातल्या सामन्यात पेस आणि वेस्नीनाच्या जोडीनं मिश्र दुहेरीत चेक प्रजासत्ताकच्या ल्यूसी हराडेका आणि फ्रांटिसेक सेरमकच्या जोडीला सरळसरळ ६-१, ६-१नं धूळ चारली. तर, भूपती आणि सानियाच्या जोडीनं पहिल्या टप्प्यातल्या सामन्यात अमेरिकेच्या राक्वेल कोप्स-जोन्स आणि एरिक बुटारेक यांच्या जोडीला ६-२, ६-४ नं मात दिली. याआधी, २००९ साली भूपती आणि सानिया या जोडीनं ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरी स्पर्धा आपल्या नावावर नोंदवली आहे.
First Published: Thursday, May 31, 2012, 18:15