Last Updated: Friday, June 1, 2012, 12:32
www.24taa.com, कोल्हापूर कोल्हापूरमधील एका पाच वर्षांच्या मुलीने ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीया देशपांडे अस या मुलीचं नाव आहे. लिंबो स्केटिंग अंडर दी कार या प्रकारात तिने विश्वविक्रम केलाय. सुमारे २७ गाड्यांखालून स्केटिंग करत श्रीयाने १५८ फूट दोन इंच एवढं अंतर पार केलंय. राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, ऋचा पुजारी अशा अनेक खेळाडूंनी जागतिक स्तरावर कोल्हापूरचं नाव झळकावले आहे.
आता श्रीयाच्या या विश्वविक्रमी कामगिरीमुळे कोल्हापुरकरांच्या मानात आणखी एक अभिमानाचा तुरा खोवण्यात आलाय, असंच म्हणता येईल. यापूर्वी बेळगावच्या अमित कोकणेच्या नावावर हा विक्रम होता. श्रीयाने हा विक्रम मोडत गीनिज बुकवर आपलं नाव कोरलं गेलं आहे.
First Published: Friday, June 1, 2012, 12:32