सानिया-भूपती फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये - Marathi News 24taas.com

सानिया-भूपती फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये

www.24taas.com, पॅरिस
 
सानिया मिर्झा आणि महेश भूपती या जोडीने दुसऱ्या ग्रँडस्लॅमकडे एक पाऊल पुढे टाकत आज फ्रेंच ओपनमध्ये मिश्र जोडीत क्वेता पेश्चके आणि माइक ब्रायन या जोडीला हारवून सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
 
मिर्झा-भूपती जोडीने एक तास लढत देत क्ले कोर्ट मेजरमध्ये खेळलेल्या क्वार्टरफाययनल मॅचमध्ये चेक प्रजासत्ताक आणि अमेरिकन जोडीचा ६-२, ६-३ ने पराभव केला.
२०१० मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता भूपती आणि सानिया यांचा आता गालिना वोस्कोबोएवा आणि डॅनियल ब्रॅसियाली  आणि नुरिया लागोस्टेरा आणि ऑलिव्हर मराच यांच्यामध्ये होणार असलेल्या क्वार्टरफायनल मॅचमधील विजेत्याशी सेमीफायनलमध्ये सामना होईल.
 

First Published: Tuesday, June 5, 2012, 11:14


comments powered by Disqus