'ख्र्याक'ला फाईट ‘सित्ता’ हत्तीणीची - Marathi News 24taas.com

'ख्र्याक'ला फाईट ‘सित्ता’ हत्तीणीची

 www.24taas.com, पोलंड
 
युरो कपच्या प्रत्येक मॅचआधी त्या मॅचचं भविष्य वर्तवणाऱ्या युक्रेनच्या ख्र्याक डुक्करला फाईट देणार आहे ती पोलंडची ‘सित्ता’ हत्तीण. सित्तानं चॅम्पियन लीगच्या मॅचेसमध्ये अचूक भविष्य वर्तवलं होतं. त्यामुळे सित्ता कोणाच्या बाजून कौल देते याबाबतही फुटबॉल फॅन्सचं लक्ष्य असणार आहे.
 
२०१० फुटबॉल वर्ल्ड कप, बाबा ‘पॉल ऑक्टोपस’नं कोणती टीम जिंकणार हे अचूक भविष्यवाणी सांगत गाजवलं. आता युरो कप स्पर्धेच्या अंदाजासाठी ‘सित्ता’ सज्ज झालीय. यजमान पोलंडची ही ३३ वर्षीय हत्तीण युरो कपचं अंदाज वर्तवणार आहे. ही हत्तीण साधी-सुधी नसून तिच्यात एक विलक्षण क्षमता आहे. तिच्यात अचूक भविष्य सांगण्याची क्षमता असल्याचा विश्वास पोलंडच्या फुटबॉल प्रेमींना आहे. पोलंडच्या क्राकोव्ह येथील प्राणी संग्रहालयात सित्ता २००६ पासून आहे. ३३ वर्षाची सित्ता संग्रालयात येणाऱ्या लोकांच मनोरंजन करताकरता आता जगातील सर्वात लोकप्रिय अशा फुटबॉल खेळाचं भाकितही वर्तवणार आहे. प्रत्येक मॅचपूर्वी सीत्तासमोर क्रिस्टल बॉल्स ठेवण्यात येणार असून, त्यां दोन बॉल्सवर त्यादिवशी होणाऱ्या मॅचमधील प्रतिस्पर्धी देशांचे नाव असेल. त्यानंतर सित्ता सोंडेनं त्या बॉल्सपैकी एक बॉल उचलून विजयाचे भाकीत सांगेल.
 
गेल्याच महिन्यात झालेल्या युरोपियन चॅम्पियन लीगचा विजेता चेल्सी असेल असं सित्ताने मॅचपूर्वीच जाहिर केलं होतं. आणि आता ‘युरोकपच्या सुरुवातीची ग्रीसविरुद्ध होणारी मॅच पोलंड जिंकेल’ ही भविष्यवाणी ही तिनं केलीय. तिच्या या भविष्यवाणीमुळे पोलंड वासींयामध्ये मॅचपूर्वीच आनंदाचं वातावरण पसरलंय. सित्ताचा मागील रेकॉर्ड शंभर टक्के आहे. त्यामुळे पोलंडच्या बाजूने दिलेल्या या भविष्यामुळे पोलंडवासी सित्तावर भलतेच खुश आहेत आणि तिला पहायला भरपूर गर्दीही करतायत. सित्ताच्या या विलक्षण क्षमतेमुळे फुटबॉल प्रेमींची टुर्नामेन्ट दरम्यान एक नजर मॅचवर तर दुसरी सित्तावर असेल हे नक्की.
 
.

First Published: Thursday, June 7, 2012, 19:11


comments powered by Disqus