भूपती-सानियानी फ्रेंच फायनलमध्ये मारली बाजी - Marathi News 24taas.com

भूपती-सानियानी फ्रेंच फायनलमध्ये मारली बाजी

www.24taas.com, पॅरिस
 
टेनिसविश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोडीनं डबल्समध्ये विजेतेपद पटकावलं आहे. सातव्या मानांकित असलेल्या या जोडीचं डबल्समधलं हे दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.
 
काल झालेल्या फायनल मॅचमध्ये भूपती-सानियानं इगनसिक-गोन्झालेझ या जोडीचा ७-६, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सानिया-भूपती या जोडीनं २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. तर याच स्पर्धेत ते २००८ मध्ये उपविजेते ठरले होते. २००९ मध्ये ग्रँडस्लॅम सानिया ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती.
 
तर भूपतीचं हे १२ वं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. विशेष म्हणजे कालच महेश भूपतीचा वाढदिवस होता. हे विजेतेपद म्हणजे त्याच्या वाढदिवसाचं गिफ्ट असून त्यानं ते आपल्या मुलीला बहाल केल्याची भावना व्यक्त केली.
 
 
 

First Published: Friday, June 8, 2012, 08:47


comments powered by Disqus