Last Updated: Monday, June 11, 2012, 20:08
www.24taas.com, पॅरिस क्ले कोर्टाचा सम्राट स्पेनचा राफाएल नादाल फ्रेंच ओपनचा विजेता ठरला आहे. नादालने फायनलमध्ये जोकोविचचा केला केला. नादालने सातव्यांदा फ्रेंच ओपन टेनिसचे विजेतेपद पटकाविले.
या विजयाबरोबरच त्याने सहावेळा विजेतेपद पटकाविणा-या बियॉन बोर्गचा विक्रम मोडला आहे. नदालने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा 6-4,6-3,2-6,7-5 अशा सेटस् मध्ये पराभव केला.
या पराभवामुळे जोकोविचचा चारी ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्याचे स्वप्न अपुरे राहिले. फ्रेंच ओपन पुरूष वर्गाचा अंतिम सामना रविवारी सुरू झाला. परंतु, पावसामुळे हा सामना मध्येच रोखण्यात आला होता. काल थांबलेला सामना सोमवारी संपला.
First Published: Monday, June 11, 2012, 20:08