Last Updated: Monday, June 11, 2012, 23:08
www.24taas.com, पॅरिस तब्बल सातव्यांदा फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावत राफाएल नादालनं नवी क्रांती घडवलीय.. राफानं फायनलमध्ये अव्वल सीडेड नोव्हाक जोकविचला चार सेटमध्ये पराभूत केलं...या विजयानं आपणच फ्रेंच ओपनचे सम्राट असल्याच त्यानं दाखवून दिलं. नादालनं बियोन बोर्गचा सहावेळा फ्रेंच ओपन जिंकण्याचा विक्रमही मोडीत काढला.
रोलँड गँरोसचा बादशाहतब्बल 3 तास 49 मिनिटं चाललेल्या फ्रेंच ओपन फायनलच्या लढतीत नादालनं टॉप सीडेड जोकोविचविरुद्ध बाजी मारली...पहिले दोन सेट गमावल्यानंतर चिवट जोकोविचनं तिसरा सेट जिंकत नादालला झुंज दिली..मात्र पावसामुळे एक दिवस पुढे ढकलेल्या लढतीत नादालने दुस-या दिवशी जोमात कमबॅक केलं..चौथ्या सेटमध्ये पिछाडीवर असणा-या नादालनं जोकोविचची सर्विस ब्रेक करत अगोदर बरोबरी साधली....नादालच्या धडाक्यापुढे जोकोविचचं काही एक चाललं नाही....आणि नादालनं चौथा सेट 7-5नं जिंकत विक्रमी विजेतपदालाही गवसणी घातली.
नादालची कामगिरीनादालनं फ्रेंच ओपनचे विक्रमी सातव्यांदा विजेतेपद पटकावले
या विजयासह नादालनं बियोन बोर्गचा सहा फ्रेंच ओपन विजेतपदांचा 31 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला.
या विजयानं ऱाफाचं फ्रेंच ओपनचा खरा बादशाह असल्याचं सिद्ध झालं.
First Published: Monday, June 11, 2012, 23:08