पोलंड X रशिया : आक्रमक खेळाचं प्रदर्शन - Marathi News 24taas.com

पोलंड X रशिया : आक्रमक खेळाचं प्रदर्शन

www.24taas.com, विरोत्सलाव
 
पोलंडनं रशियाला बरोबरीत रोखत युरो कपमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. रशियाला बरोबरीत समाधान मानाव लागलं. आणि पोलिश टीमनं आपल्या घरच्या चाहत्यांना जराही निराश केलं नाही. युरो कपमधील या मॅचमध्ये पहिल्यांदा अटॅकिंग फुटबॉल पहायला मिळालं.
 
पोलंडविरुद्धच्या मॅचमध्ये रशिया आरामात बाजी मारत क्वार्टर फायनल गाठेल, अशी आशा त्यांच्या चाहत्यांना होती. मात्र, को-होस्ट असलेल्या पोलिश टीमनं त्यांना चांगलीच झुंज देत रशियाला बरोबरीत समाधान मानायला भाग पाडलं. सुरुवातीच्या रटाळ मॅचेसनंतर फुटबॉलप्रेमींना अखेर अटॅकिंग फुटबॉल पाहायला मिळालं. मॅचच्या सुरुवातीपासूनच दोन्ही टीम्सनी आपली आक्रमण वाढवली. आणि मॅचवर आपली पकड मजबूत करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पहिल्या हाफमध्ये पोलिश टीमनं गोल करण्यासाठी अनेक संधी निर्माण केल्या मात्र, याचं रुपांतर त्यांना गोलमध्ये करता आला नाही. त्यांची जोरदार आक्रमण पाहाता पोलिश टीम पहिल्या हाफमध्ये आघाडी घेईल अशी अपेक्षा होती. पोलोन्सकीनं पोलंडकडून गोल केला पण तो ऑफसाईड होता. त्यानंतर चेक रिपब्लिकविरुद्धच्या मॅचचा हिरो असलेल्या ऍलन झगोव्हनं ३७ व्या मिनिटाला गोल झळकावत रशियाला आघाडी मिळवून दिली. त्याचा टुर्नामेंटमधील हा तिसरा गोल ठरला.
 
पहिल्या हाफमध्ये आघाडी घेतल्यानंतर रशिया पोलंडवर सहज मात करेल अस वाटतं होतं. मात्र तसं काहीच झालं नाही. उलट सेंकड हाफमध्ये पोलिश टीम रशियापेक्षा सरस ठरली. कॅप्टन झाकूब ब्लास्को वस्कीनं ५७ व्या मिनिटाला गोल करत पोलिश टीमला बरोबरी साधून दिली. त्यानं टुर्नामेंटमधील आत्तापर्यंतचा सर्वोत्तम गोल केला. हा गोल केल्यानंतर त्याला आपल्या चेह-यावरचा आनंद लपवता आला नाही. याच गोलनंतर पोलिश टीमनं रशियाला आपला गेम चेंज करायला भाग पाडलं. मॅचच्या शेवटी दोन्ही टीम्सनी अटॅकिंग गेम खेळला खरा मात्र, दोन्ही टीमला गोल करण्यात अपयश आलं. आणि पोलंडला रशियाला बरोरबरीत रोखण्यात यश आलं.
 
.

First Published: Wednesday, June 13, 2012, 15:07


comments powered by Disqus