जर्मनीची युरो कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक - Marathi News 24taas.com

जर्मनीची युरो कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक

www.24taas.com, युक्रेन
 
नेदलँड्सला पराभूत करत जर्मनीनं युरो कपच्या क्वार्टर फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. मारियो गोमेझ पुन्हा एकदा जर्मनची विजयाचा खऱ्या अर्थानं हिरो ठरला. मात्र, या पराभवामुळे नेदरलँड्सचं टुर्नामेंटमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
 

युरो कपमधील नेदरलँड्स आणि जर्मनी यांच्यातील मॅच ऑरेंज आर्मीसाठी अतिशय महत्त्वाची होती. टुर्नामेंटमधील आपल्या आशा कायम ठेवण्यासाठी नेदरलँड्सला जर्मनीला पराभूत करावच लागणार होतं. मात्र, त्यांना जर्मनीला बरोबरीत तर रोखताच आलचं नाही शिवाय आणखी एका पराभवाला सामोर जाव लागलं. जर्मनीच्या जबरदस्त खेळापुढे ‘ऑरेंज आर्मीचं’ काहीच चाललं नाही. जोकिम लो यांच्या अनुभवी फुटबॉलपटूंनी नेदरलँड्सच्या टीमला पराभव सहन करण्यास भाग पाडलं. या मॅचमध्ये कोच जोकिम लो यांनी पोर्तुगालविरुद्धच्या मॅचच्या विजयाचा शिल्पकार ठरलेलल्या मारियो गोमेझला मिरोस्लाव्ह कोसाऐवजी संधी दिली. त्यानंही आपल्या कोचचा विश्वास सार्थ ठरवला. आणि जर्मनाला धडक्यात क्वार्टर फायनल गाठून दिली.



२४ व्या मिनिटाला अनुभवी बास्टिन श्वाईनस्टायगरच्या पासवर गोमेझनं मॅचमधील पहिला गोल झळकावत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १२ मिनिटातचं जर्मनीनं दुसरा गोल करण्याची किमया साधली. पुन्हा एकदा गोमेझ आणि श्वाईनस्टायगरच्या कॉम्बिनेशननं हा गोल केला. आणि पहिल्या हाफमध्ये जर्मनीनं २-० नं आघाडी घेतली. सेकंड हाफमध्ये नेदरलँड्सनं जर्मनीचा बचाव भेदत गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. आणि अखेर ७३ व्या मिनिटाला त्यांना गोल करण्यात यश आलं. रॉबिन वॅन पर्सीनं मैदानी गोल करत नेदरलँड्सला मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र त्यानंतर ऑरेंज आर्मीचा प्रत्येक प्रयत्न जर्मनीनं हाणून पाडला आणि टॉप एटमधील आपला प्रवेश निश्चित केला. आता रविवारी त्यांचा मुकाबला नेदरलँड्सला पराभवाचा धक्का देणाऱ्या डेन्मार्कशी होणार आहे.



.

First Published: Thursday, June 14, 2012, 07:18


comments powered by Disqus