Last Updated: Thursday, June 14, 2012, 16:34
www.24taas.com, लखनौ 
लखनौ येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या कुस्ती शिबिरादरम्यान हरयाणाच्या एका मुलीने प्रशिक्षकाविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केल्याच्या घटनेनंतर आता याविषयाला एक वेगळे वळणलागले असून असे काहीही घडलेच नव्हते.
आणि प्रशिक्षकांमधील वैयक्तिक वाद याला कारणीभूत असल्याचे क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे . एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की , ' त्याप्रशिक्षकाविरुद्ध चार कुस्तीपटूंनी जी तक्रार केली होती.
त्यांच्या स्वाक्षऱ्याच खोट्या आहेत. शिवाय, ज्या मुलीने शोषणाची तक्रार केल्याचे वृत्त होते , तिनेही आपण कोणत्याही प्रशिक्षकावर आरोप केलेला नसल्याचे म्हटले आहे . या मुलीची कोणतीही तक्रार नाही असे म्हंटले आहे.
First Published: Thursday, June 14, 2012, 16:34