Last Updated: Friday, June 15, 2012, 00:02
www.24taas.com, कोलकाता अशियाई खेळांमध्ये २००६ साली सुवर्ण पदक जिंकलेली पिंकी प्रामाणिक भलतीच अप्रामाणिक असल्याचं समोर आलं आहे. पिंकी वास्तवात एक पुरूष असून तिने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका विधवा महिलेने केला आहे. यानंतर पोलिसांनी पिंकीला अटक केलं आहे.
पिंकी या विधवा महिलेवर वारंवार बलात्कार करत होता, तसंच तिला जीवे मारण्याचाही त्याने प्रयत्न केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पिंकीला अटक केल्यानंतर कोर्टापुढे हजर करण्यात आलं. त्यानंतर पिंकीला एका खासगी रुग्णालयात नेऊन तेथे मेडिकल चेक अप केला गेला. या चेक अपच्या रिपोर्टमधून समोर आलं आहे की पिंकी स्त्री नसून पुरूष आहे.
पिंकीने २००६ साली दोहा येथील एशियन गेम्समध्ये ४०० मीटर रीलेस्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. तीन वर्षांपूर्वीच त्याने एथलेटिक्समधून निवृत्ती घोऊन रेल्वेमध्ये तिकीट निरीक्षकाची नोकरी करण्यास सुरूवात केली होती.
First Published: Friday, June 15, 2012, 00:02