लिएंडर पेसला रोहन बोपन्नची साथ - Marathi News 24taas.com

लिएंडर पेसला रोहन बोपन्नची साथ

www.24taas.com, नवी दिल्ली
 
लंडन ऑलिंपिकमध्ये लिएंडर पेसबरोबर खेळण्यास महेश भूपतीनं नकार दिला आहे. त्याच्या नाराजीनंतर भारतीय टेनिस महासंघानं आता लिएंडर पेसबरोबर भूपती न गेल्यास रोहन बोपन्न लंडनला जाईल असा निर्णय घेतला आहे.
 
महेश भूपतीनं सिलेक्शनबाबत मीडियामध्ये उघडपणे आपलं मत व्यक्त करायला नको होतं, असही AITA ने म्हटलं आहे. दरम्यान, बोपन्नानही लिएंडर पेसबरोबर खेळण्यास याआधीच नकार दिला आहे. त्यामुळे भारताकडून लिएंडर पेसबरोबर लंडन ऑलिंपिकमध्ये कोण खेळणार याबाबत अजूनही प्रश्न चिन्ह कायम आहे. त्याचप्रमाणे भारतीय ऑलिंपिक महासंघानं भारतीय टेनिस महासंघाकडे या सा-या प्रकरणारचा रिपोर्ट मागितला आहे.
 
संबंधित बातमी
 
पेसने माझ्या पाठीत खंजीर खुपसला- भूपती

पेसने माझ्या पाठीत खंजीर खुपसला- भूपती
लिएंडर पेस आणि महेश भूपती या भारताच्या ऑल टाईम ग्रेट टेनिस जोडीनं लंडन ऑलिंपिकमध्ये एकत्र खेळावं असा निर्णय भारतीय टेनिस महासंघानं घेतला आहे. मात्र, भूपती पेसबरोबर खेळण्यास तयार नाही. 'पेसने माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे'.

First Published: Sunday, June 17, 2012, 13:32


comments powered by Disqus