Last Updated: Tuesday, June 19, 2012, 19:16
www.24taas.com, कोलकताबलात्कार आणि पुरूष असल्याची आरोपी असलेल्या आशिया खेळात सुवर्ण पदक जिंकणारी पिंकी प्रामाणिकचे मंगळवारी लिंग निर्धारण परीक्षण करण्यात आले. पिंकीला अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठ़डीत तिची रवानगी करण्यात आली आहे.
बिधाननगरचे पोलिस आयुक्त राजीब कुमार यांनी सांगितले की, मंगळवारी पिंकीचे लिंग निर्धारण परीक्षण करण्यात आले. सरकारी हॉस्पीटलमध्ये हे परीक्षण करण्यात आले. या कामासाठी सात सदस्यीय पथक स्थापन करण्यात आले.
पिंकीला गेल्या गुरूवारी अटक करण्यात आले होते. शुक्रवारी तिला १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते.
पिंकी स्त्री नसून पुरूष आहे. आणि त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पिंकीची लिव इन पार्टनरने केला होता. पिकींनी शारीरिक यातनाही दिल्याचा आरोप या विधवेने केला आहे. पिंकीने यापूर्वी दोन वेळा अशा प्रकारे लिंग परीक्षण करण्यास नकार दिला होता. परंतु सोमवारी पिंकीने परीक्षण करण्यात सहमती दर्शविली होती. त्यानुसार आज तिचे परीक्षण करण्यात आले.
या प्रकरणात मला जाणून-बूजून फसविण्यात येत असल्याचे पिंकीने म्हटले आहे. या प्रकरणामुळे पूर्व रेल्वेने रविवारी पिंकीला तिकीट कलेक्टरच्या पदावरून निलंबित केले आहे.
First Published: Tuesday, June 19, 2012, 19:16