Last Updated: Thursday, June 21, 2012, 14:16
www.24taas.com, नवी दिल्ली 
ऑलिम्पिसाठी मेन्स डबल्स दोन टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पेसची जोडी युवा विष्णू वर्धनसोबत करण्यात आली आहे. तर डबल्समधील दुसरी जोडी असणार आहे ते भूपती आणि बोपन्ना यांची दुसरी जोडी ऑलिम्पिकसाठी जाणार आहे. आयटानं आज ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या या दोन टीम जाहीर केल्या.
भारतीय टेनिस टीमची आज घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पेस विरुद्ध भूपती-बोपन्ना वादाचा फैसला आज करण्यात आला आणि त्यानंतर दोन वेगवेगळ्या टीम पाठविण्याचा निर्णय एआयटीएने घेतला.
भारतीय टेनिस संघटना ऑलिंपिकसाठी कोणती टीम निवडते याची सर्वांनाचा उत्सुक्ता लागून राहिली होती.ऑलिम्पिकसाठी पेसला पाठवण्यास टेनिस संघटना ठाम आहे.
First Published: Thursday, June 21, 2012, 14:16