Last Updated: Friday, June 22, 2012, 11:00
www.24taas.com, वारसा युरो कप २०१२ च्या गुरुवारी रात्री खेळल्या गेलेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं केलेला गोल मॅचचा निर्णायक गोल ठरला. आणि पोर्तुगालनं चेक गणराज्यला १-० फरकानं हरवलं... या विजयामुळे पोर्तुगालनं युरोकपच्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलंय.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गोल्ड गोलमुळेच पोर्तुगालानं धडाक्यात युरो कपच्या सेमी फायनलमध्ये ध़डक मारली. पोर्तुगालनं क्वार्टर फायनच्या मॅचमध्ये चेक रिपब्लिकचा १-० नं पराभव केला. ७९ व्या मिनिटाला कॅप्टन रोनाल्डोनं आपल्या टीमला आघाडी मिळवून दिली. आणि शेवटच्या दहा मिनिटात पोर्तुगालनं चेक रिपब्लिकला गोल करण्याची कुठलीही संधी दिली नाही. आणि आपला सेमी फायनलचा प्रवेश निश्चित केला.
First Published: Friday, June 22, 2012, 11:00