Last Updated: Wednesday, June 27, 2012, 09:57
www.24taas.com, लंडन ऑलिम्पिकला उरलाय केवळ एक महिना... १३ गेम्समध्ये भारताची दावेदारी... मेडल्ससाठी झुंजणार तब्बल ८१ भारतीय प्लेअर्स ... लंडन ऑलिम्पिकचं काऊंटडाऊन सुरु झालंय... बरोबर एक महिन्यानी लंडनमध्ये क्रीडाक्षेत्राचा हा महाकुंभ सुरु होणार आहे. भारतीय प्लेअर्सनीही लंडनमध्ये मेडलचा वेध घेण्यासाठी सज्ज झालेत.
भारताची ऑलिम्पिक सफर ११२ वर्षांपूर्वी सुरु झाली. तेव्हापासून सुरु झालेल्या भारताच्या ऑलिम्पिक सफरमध्ये निराशाच जास्त पदरी पडली. हॉकीनं अनेक भारतीयांना मेडल मिळवून दिलं. मात्र, तसं भारत मेडल्स मिळवण्यात बराच मागे पडला. भारताला हॉकीशिवाय कधीतरी कुस्ती, टेनिस आणि वेटलिफ्टिंगमध्ये मेडल मिळालेत. वैयक्तिक गोल्ड मेडल मिळवण्यासाठी तर भारताला १०८ वर्षांची वाट पाहावी लागली. यंदा शूटिंगशिवाय बॉक्सिंग, आर्चरी, टेनिस, बॅडमिंटन, कुस्तीमध्येही भारताच्या मेडल्सच्या शर्यतीत आहे.
बीजिंगमध्ये तीन मेडल्सची कमाई करत भारतीयांनी ऑलिम्पिक मधील आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. बीजिंगनंतर आता लंडनमध्ये पहिल्यांदाच बॉक्सर्सचा दम दिसला. जगभरातील अव्वल प्लेअर्समध्ये ८१ भारतीय १३ क्रीडाप्रकारात मेडल्ससाठी दावेदारी सांगतील. आता लंडनमध्ये भारतीय इतिहास घडवणारा का? भारतीयांचं मेडल्स ड्रीम लंडनमध्ये हे प्लेअर्स कसं पूर्ण करणार? याकडेच कोट्यवधी भारतीयांच लक्ष असेल.
.
First Published: Wednesday, June 27, 2012, 09:57