ऑलिम्पिकमध्ये भारताचे ५ बॅडमिंटनपटू भिडणार - Marathi News 24taas.com

ऑलिम्पिकमध्ये भारताचे ५ बॅडमिंटनपटू भिडणार

www.24taas.com, लंडन
 
लंडनमध्ये शूटिंग, बॉक्सिंगशिवाय बॅडमिंटनमध्येही भारताला मेडल्स अपेक्षा असणार. जबरदस्त फॉर्मात असलेली  सायना नेहवाल,  पी.कश्यप मेडल्ससाठी प्रबळ दावेदार आहेत. तर ग्लॅमरस ज्वाला गुट्टाही अश्विनी पोनप्पा आणि व्ही. दिजूसह जलवा दाखवण्याची क्षमता ठेवते.
 
शटलर क्वीन सायना नेहवाल, ग्लॅमर क्वीन ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा, पी.कश्यप आणि व्ही. दिजू  भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच बॅडमिंटनपटू ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावण्यासाठी मुकाबला करणार आहेत.
 
हैदराबादच्या या फुलराणीनं बॅडमिंटनमधील चायनीज, कोरियन आणि इंडोनेशियन साम्राज्य खालसा केलं.  बॅडमिंटन कोर्टवर तिनं एकामागून एक यशाची शिखरं पादाक्रांत केली आणि आता ऑलिम्पिकमध्ये तिची दावेदारी सर्वाधिक मजबूत आहे. सुपर सीरिजमध्ये आपल्या खेळानं वेगळी छाप सोडणाऱ्या सायनाकडून ऑलिम्पिकमध्ये मेडलची अपेक्षा आहे.
 
ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा वर्ल्ड रँकिंगमध्ये १६ व्या क्रमांकावर आहेत. या जोडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्या ग्लॅमरस लूकसाठी बॅडमिंटनविश्वात लोकप्रिय अससेली ज्वाला सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणार आहे. तर मिक्स डबल्समध्ये ज्वाला आणि दिजू ही १५ वी मानांकित जोडीही सीडेड बॅडमिंटनपटूंना पराभवाचा धक्का देऊ शकतात. ज्वाला-दिजू गेली अनेक वर्ष भारतासाठी खेळतायत. त्यामुळे याचा फायदा त्यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये होणार आहेत.
 
पी. कश्यप मेन्स सिंगल्समध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करेल. कश्यपनं इंडियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक मारत आपले इरादे स्पष्ट केले होते. पहिल्यांदाच भारताचे पाच बॅडमिंटनपटू ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाल्यानं त्यांच्याकडून मेडलची अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाही.
 
.

First Published: Wednesday, June 27, 2012, 10:24


comments powered by Disqus