Last Updated: Wednesday, June 27, 2012, 23:45
www.24taas.com, वॉर्सा 
युरो कपचा थरार आता अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. आतापर्यंतच्या झालेल्या मॅचेसमध्ये विजयासाठी मैदानावर प्लेअर्सची चढाओढ दिसलीच..तर मैदानाबाहेर आपल्या देशाच्या टीम्सला समर्थन करणाऱ्या ललनांमध्येही चांगलीच चढाओढ दिसली....
टीमच्या सपोर्ट करण्यासाठी आपल्या सुंदरतेचा अचूक वापर ललनांनी केला आहे. कोणी बॉडी पेंट करून तर कोणी देशाचा आकर्षक ड्रेस परिधान करून आपल्या टीमला सपोर्ट करतात.
स्टेडियमवरील त्यांच्या अदांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. किंबहुना प्लेअर्सच्या मैदावरील परफॉमन्सबरोबर स्टेडियमवरील ललनांवरही अनेकदा कॅमेरा स्थिरावतो. त्यामुळेच की काय फुटबॉलच्या थरारबरोबर ब्युटी इन फुटबॉलमुळेही युरो कप लक्ष वेधून घेत आहे..
First Published: Wednesday, June 27, 2012, 23:45