फेडरर, जोकोव्हिच विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत - Marathi News 24taas.com

फेडरर, जोकोव्हिच विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत

www.24taas.com, विम्बल्डन, इंग्लंड
 
विम्बल्डनचा राजा रॉजर फेडरर सेंटर कोर्टवर मुक्त  वाऱ्याप्रमाणे वावरताना दिसला. सातव्यांदा विम्बल्डन जिंकण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरलेला फेडरर आणखी एक पायरी वर चढलाय. ७४ मिनिट चाललेल्या मॅचमध्ये फेडररने फॅबीयो फॉगनीनीचा ६-१, ६-३, ६-२ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या विजयामुळे फेडररची तिसऱ्या राऊंडमध्ये सहज  एन्ट्री मिळवलीय.
 
तर दुसऱ्या मॅचमध्ये डिफेन्डिंग चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचनं अमेरिकेच्या रायन हॅरिसनचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव करत तिसऱ्या राऊंडमध्ये धडक मारली आहे. वर्ल्ड नंबर वन नोव्हाक जोकोविचचा मुकाबला चेकच्या राडेक स्टेपनेक किंवा जर्मनीच्या बेंजिमन बेकरशी होईल.
 
.

First Published: Thursday, June 28, 2012, 09:35


comments powered by Disqus