Last Updated: Thursday, June 28, 2012, 09:46
www.24taas.com, विम्बल्ड, इंग्लंड मेन्स डबल्समध्ये सातवी सीडेड महेश भूपती आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीनं विम्बल्डन्सच्या दुसऱ्या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केलाय.
उरुग्वेच्या मार्सेल फेल्डर आणि तन्झानियाच्या मालेक जाझिरी या जोडीवर भूपती-बोपन्नानं ६-०, ७-६, ६-२ असा विजय मिळवला. १ तास ३६ मिनिट हा खेळ सुरू होता. भारतीय टेनिसमध्ये ऑलिम्पिकवरुन चाललेल्या वादाचा सध्यातरी या जोडीच्या परफॉर्मन्सवर फरक पडलेला दिसत नाहीए. भूपती-बोपन्नाची ही जोडी ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
दुसऱ्या राऊंडमध्ये आता या भारतीय जोडीला रुसच्या मिखाइल एल्गिन आणि उजबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन तसंच पाब्लो अंदुजार आणि गुइलेर्मो गार्सिया लोपेजच्या स्पेनमध्ये होणाऱ्या मॅचमधल्या विजयी जोडीला टक्कर द्यावी लागेल.
.
First Published: Thursday, June 28, 2012, 09:46