स्पेनचा विजय खेळाडूंच्या 'हॉट गर्लफ्रेंड'मुळे? - Marathi News 24taas.com

स्पेनचा विजय खेळाडूंच्या 'हॉट गर्लफ्रेंड'मुळे?

www.24taas.com, वृषाली देशपांडे, वॉर्सा
 
स्पॅनियार्ड फुटबॉल टीमनं मैदानावरील कामगिरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलविश्वात आपला दबदबा निर्माण केला आहे. युरो कपचं सलग दुसऱ्यांदा विजेतपद मिळवण्याची संधी स्पॅनिश टीमला आहे. त्यातच या फुटबॉलपटूंच्या गर्लफ्रेंडमुळे त्यांच्या टीमला एक अनोख ग्लॅमर मिळालं आहे. पॉपस्टार शकिराच्या वाका वाका गाण्यावर २०१० फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये जगभरातील फुटबॉलप्रेमींनी ताल धरला. आणि याच वर्ल्ड कपदरम्यान शकिरा आणि स्पॅनिश टीमचा डिफेंडर जेराड पीक यांच्यांमध्ये एका नव्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.
 
जेराडच्या अनेक मॅचेसना शकिराची आवर्जुन उपस्थित असते. त्याचप्रमाणे त्यानं गोल करण्याचा सुरेख प्रयत्न केला अथवा त्याच्याकडून गोल मिस झाला की, तिच्या चेहऱ्यावरचे भाव सारं काही बोलून जातात. युरो कपमध्येही ही ग्लॅमरस जोडी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरतेय. स्पॅनिश टीमची ती सर्वात ग्लॅमरस सपोर्टर ठरलीए. शकिराप्रमाणे ईकेर कॅसियाची गर्लफ्रेंड सारा कार्बोनेराही चर्चेचा विषय ठरलीय. स्पेनमधील एका न्यूज चॅनलची ती अँकर आणि रिपोर्टर आहे. त्यामुळे कॅसियसच्या जळपास साऱ्याच बड्या टुर्नामेंट्समध्ये तिची उपस्थिती असते. कॅसियस मैदानावर असतो तेव्हा ती त्याचा उत्साह वाढवत असते. आणि जेव्हा तो एखादी टुर्नामेंट जिंकतो त्यावेळी  या विजयी कॅप्टनच्या भावना ती त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवते.
 
फुटबॉलर आणि रिपोर्टरची ही हॉट अँड हॅपनिंग जोडी फुटबॉलविश्वात चांगलीच लोकप्रिय आहे. २००८ ची युरोपियन चॅम्पियन आणि २०१० ची वर्ल्ड चॅम्पियन टीम असलेल्य़ा स्पॅनिश टीमचा यशस्वी कॅप्टन आहे. आणि त्याच्या या यशाचं ग्लॅमरस वृत्तांकनं त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवते ती त्याची गर्लफ्रेंड कार्बोनेरा. युरो कपमध्ये मिड फिल्डर सेक फाब्रेगासची जादू चांगलीच चालली आहे. डॅनियेला सेमान ही त्याची गर्लफ्रेंडही चर्चेचा विषय ठरली आहे. फाब्रेगासचा उत्साह वाढवतांनाही ती नेहमीच दिसते. स्पॅनिश टीमच्या या ग्लॅमरस गर्लफ्रेंड्स स्पॅनियार्ड टीमचं ग्लॅमर आणखी वाढवतायत असचं म्हणाव लागणारए....
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Friday, June 29, 2012, 18:10


comments powered by Disqus