'कंडोम'चा वापर करावा ऑलिंम्पिक प्रेक्षकांनी.. - Marathi News 24taas.com

'कंडोम'चा वापर करावा ऑलिंम्पिक प्रेक्षकांनी..

www.24taas.com, लंडन
 
लंडन ऑलिंम्पिकच्या आधी ब्रिटेन आरोग्य समितीने यौन संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित शरीरसंबंध करण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य सुरक्षा समितीने ऑलिंम्पिकमध्ये वेगवेगळ्या स्तरावर सुरक्षेसाठी एक विशेष प्रकिया तयार केली आहे.
 
सुरक्षा समितीने म्हंटले आहे की, लंडन ऑलिंम्पिकसाठी तयार झाले आहेत. आणि त्यासाठी काही सुचनांची यादी देण्यात आली आहे. आणि त्यातमध्ये त्यांना शरीरसंबंधाविषयी देखील काही सुचना करण्यात आल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिंम्पिकसाठी लंडनमध्ये अनेक वेश्या दाखल होणार आहेत.
 
एचपीएचे मुख्य कार्यकारी जस्टिन मैकक्राकेनने सांगितले की, आम्ही प्रयत्न करीत आहोत की, पुर्ण सुरक्षेसह खेळाचा आनंद लुटला जावा अशी आमची इच्छा आहे. ऑलिंम्पिकसाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी शरीरसंबंधाच्यावेळेस कंडोमचा वापर करावा. ज्याने आपलं यौनसंबंध सुरक्षित राहिल.
 
 
 

First Published: Tuesday, July 3, 2012, 21:37


comments powered by Disqus