सेरेना दी ग्रेट! पाचव्यांदा ‘विम्बल्डन’वर ताबा - Marathi News 24taas.com

सेरेना दी ग्रेट! पाचव्यांदा ‘विम्बल्डन’वर ताबा

www.24taas.com, विम्बल्डन
 
पोलंडच्या तिसऱ्या मानांकित रडावान्स्कावर मात करत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं विम्बल्डनचं पाचव्यांदा अजिंक्यपद पटकावलंय.
 
सेरेनानं रडावान्सकाचा ६-१, ५-७, ६-२ अशा तीन सेट्समध्ये धुव्वा उडवला. या विजेतेपदासह सेरेनानं तब्बल पाचव्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावल आहे. तर आपल्या टेनिस करिअरमधील हे सरेनाचं १४ वं ग्रँडस्लॅम ठरलं आहे. दुखापतीमुळे बराच काळ टेनिसकोर्टवर बाहेर रहाव लागणाऱ्या सेरेनानं जोरदार कमबॅक करत विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर बाजी मारली आहे.

First Published: Sunday, July 8, 2012, 07:13


comments powered by Disqus