... अखेर पिंकीला जामीन मंजूर - Marathi News 24taas.com

... अखेर पिंकीला जामीन मंजूर

www.24taas.com, कोलकाता 
 
आशियाई खेळात सुवर्णपदक पटकावलेली खेळाडू पिंकी प्रामाणिक हिला आज तब्बल २५ दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आलाय. उत्तर २४ परगणा जिल्हा न्यायालयानं तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
 
पिंकी स्त्री नसून पुरूष आहे आणि त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. आपण ‘पिंकीची लिव्ह इन पार्टनर’ असल्याचा दावा या ३० वर्षीय विधवा महिलेने केला होता. त्यानंतर पिंकीला १४ जून रोजी अटक करण्यात आली होती. एसएसकेएल हॉस्पिटलला पिंकीच्या क्रोमोसोम पॅटर्न टेस्टचा रिपोर्ट मिळालाय. या रिपोर्टवरूनच पिंकी महिला आहे की पुरुष हे सिद्ध होणार आहे.
 
याशिवाय उच्च न्यायालयातही ६ जुलै रोजी एक जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. यामध्ये जेलमध्ये अॅथलिट पिंकीबरोबर अमानवीय वर्तवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगानंही याची गंभीर दखल घेतलीय. या संबंधी चौकशी करण्याचे आदेश आयोगानं गृह खातं, स्वास्थ्य विभाग आणि पोलिसांना दिलेत.
 
पिंकी प्रामाणिक हिनं २००६ मध्ये दोहा आशियाई स्वर्ण पदक पटकावलं होतं. तर २००६ मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्य कॉमनवेल्थ खेळांत रजत पदक पटकावलं होतं.
 
 

First Published: Tuesday, July 10, 2012, 17:11


comments powered by Disqus