लंडन ऑलिम्पिक : डोंग ह्युनची विजयी सलामी - Marathi News 24taas.com

लंडन ऑलिम्पिक : डोंग ह्युनची विजयी सलामी

www.24taas.com, लंडन
लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये दक्षिण कोरियाच्या डोंग ह्युननं लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केलीय.
 
डोंगनं तिरंदाजीच्या टीम इव्हेंटच्या रँकिंग राऊंडमध्ये आपल्या टीमसह ७२० पैकी ६९९ पॉईंट्सची कमाई केली. त्याच्या शानदार कामगिरीमुळे दक्षिण कोरियाच्या टीमला वर्ल्ड रेकॉर्ड करता आला.  डोंग ह्युनला द्रृष्टी नसूनही त्यानं अथेन्स आणि बीजिंगमध्ये तिरंदाजीच्या टीम इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याची किमया साधली.
 
डोंग ह्युनला जवळची द्रृष्टी नाही मात्र त्याला लांबचं दिसतं. तरिही त्यानं अचूक वेध साधला आहे. त्यामुळेच त्याची दूरद्रृष्टी कोरियन तिंरदाजी टीमला वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे.

First Published: Saturday, July 28, 2012, 16:22


comments powered by Disqus