'ऑलिम्पिक'मध्ये भारताची सुरूवात पराभवाने - Marathi News 24taas.com

'ऑलिम्पिक'मध्ये भारताची सुरूवात पराभवाने

www.24taas.com, लंडन
 
ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात परभवानं झाली आहे. बॅडमिंटनच्या मिक्स डबल्सच्या पहिल्याच राऊंडमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजूला पराभवाचा धक्का सहन करावा लगाला आहे. इंडोनेशियाच्या अहमद आणि नातसिरल जोडीनं ज्वाला-दिजूचा 21-16, 21-12 अशी सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
 
पहिल्या सेटमध्ये इंडोनेशियन जोडीनं भारतीय जोडीचा अवघ्या 12 मिनिटांत धुवा उडवला. त्यानंतर दुस-या गेममध्ये ज्वाला दिजू कमबॅक करतील अशी अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्या गेममध्येही इंडोनेशियन जोडीनं 12 मिनिटातचं ज्वाला आणि दिजूला पराभूत केलं.
 
भारतीय आर्चरी टीमचं आव्हान पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं आहे. भारताला एलिमिनेशन राऊंडमध्ये जपानकडून पराभव स्वीकारावा लागला. जपाननं भारताचा 243-241 नं पराभव केला. चार राऊंडनंतर भारत आणि जपान यांचे पॉईंट्स बरोबर झाले. त्यानंतर टायब्रेकरमध्ये या मॅचचा रिझल्ट लागला. जयंत तालुकदार, राहुल बॅनर्जी आणि तरुणदीप राय या भारताच्या अव्वल आर्चर्सना अचूक वेध साधता आला नाही. आणि आर्चरी टीमला पहिल्याच राऊंडमध्ये ऑलिम्पिकमधून बाहेर पडाव लागलं.
 

First Published: Saturday, July 28, 2012, 16:08


comments powered by Disqus