आज ऑलिम्पिकमध्ये... - Marathi News 24taas.com

आज ऑलिम्पिकमध्ये...

www.24taas.com, लंडन
ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतासाठी थोडी खुशी थोडा गम ठरला असला तरी आज ऑलिम्पिकमधले भारताचे उरलेले दावेदार मात्र दुसऱ्या दिवसासाठी सज्ज झालेत. ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या साऱ्या आशा या सायना नेहवालकडून असणार आहेत. सायना ऑलिम्पिकमधील आपली आज पहिली मॅच खेळणार आहे.
 
त्याचप्रमाणे ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू मिक्स डबल्समध्ये आपल्या पहिल्या विजयाच्या प्रयत्नात असतील. तर तिरंदाजीच्या टीम इव्हेंटमध्ये भारतीय महिलांसाठी आज महत्वाची मॅच असेल. तर बॉक्सिंगमध्ये जय भगवान आपलं नशीब आजमावणार आहे. शूटिंगमध्ये हिना सिंधू आणि अन्नुराज 10 मी. एअर पिस्तल प्रकारात लढणार आहेत. त्याचप्रमाणे वेटलिफ्टिंग रोईंगमध्ये भारताची दावेदारी असेल.

First Published: Sunday, July 29, 2012, 09:18


comments powered by Disqus