Last Updated: Monday, July 30, 2012, 20:31
www.24taas.com, मुंबई मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या शूटर गगन नारंग याला शुभेच्छा दिल्या आहेत. नारंगने देशाचा मान वाढविला असल्याचे सचिनने आपल्या संदेशात म्हटले आहे.
नारंगने सोमवारी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिले वहिले पदक पटकावले.
सचिनने ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर ट्विट करताना म्हटले की, नारंगने संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंच केली आहे. गगन नारंगने ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक पटकावून आम्हा सर्व भारतवासियांना गौरवान्वित केले आहे. आशा आहे की तुम्ही देशाला आणखी पदक पटकवून द्याल.....
First Published: Monday, July 30, 2012, 20:31