ऑलिम्पिक- कश्यपची आगेकूच - Marathi News 24taas.com

ऑलिम्पिक- कश्यपची आगेकूच

Tag:  
www.24taas.com, लंडन
लंडन ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी बॅडमिंटनमध्ये भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीत प्ले स्टेजच्या एका सामन्यात व्हिएतनामच्या तीन मिन्ह गुएनला पराभूत केले आहे. या विजयासह कश्यपने पुरुष एकेरीच्या अंतिम १६ मध्ये प्रवेश केला आहे. ३५ मिनीटे चाललेल्या या सामन्यात कश्यपने व्हिएतनामच्या बॅडमिंटनपटूचा २१-९,२१-१४ असा पराभव केला.
तिरंदाजीत भारताचा खेळाडू तरुणदीप रॉय याने क्युबाच्या  स्टिवन्स जुआन कालरेसला पराभूत केले असून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, पुढील फेरीत त्याला कोरियाच्या खेळाडूने पराभूत केले.
 
दुसरीकडे भारताच्या एका बॉक्सरने होंडुरासच्या बॉक्सरला एका पंचमध्येच गारद केले. भारतीय संघाचा बॉक्सर एल. देवेंद्रोसिंग याने दोन मिनिटाच्या आत आपला प्रतिस्पर्धी मोलिना बेयरोन याला पराभूत केले. रेफरीने सामना मध्येच थांबवून एल. देवेंद्रोसिंगला विजयी घोषित केले. देवेंद्रोसिंग आता उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे.
ऑलिम्पिकच्या इतर सामन्यांमध्ये
ज्वाला आणि अश्विनी पोनप्पा जोडी विजयी –
महिला एकेरी गटात आज ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही जोडी विजयी झाली आहे. सिंगापूरच्या शिंता मुलिया आणि याओ लेई या जोडीला यांनी पराभूत केले.
गरिमा चौधरी पराभूत – 
ज्यूदोच्या ६३ किलो वजनी गटात एलिमिनेशन राऊंडमध्ये भारताच्या गरिमा चौधरीचा जपानच्या असाहिकावाकडून पराभव झाला.
 
ज्वाला-दिजूचे आव्हान संपुष्टात – 
तसेच बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीतीत भारताची ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू यांचे आव्हान संपुष्टात आले. क गटात त्यांचा एक सामना बाकी आहे. त्यात विजय मिळवला तरी ही जोडी नॉक आऊट फेरीसाठी पात्र होऊ शकणार नाही.

First Published: Tuesday, July 31, 2012, 21:59


comments powered by Disqus