तरूणींनी ऑलिम्पिकमध्ये 'जिंकून दाखवलं' - Marathi News 24taas.com

तरूणींनी ऑलिम्पिकमध्ये 'जिंकून दाखवलं'

www.24taas.com, लंडन
 
लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला आपला ठसा उमटवीत आहेत. यंदाच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये लिथुआनियाची जलतरणपटू रुटा मेलियुटाइट व युक्रेनची तलवारपटू (ईपी फेन्सिंग) याना शेमयाकिना या १५ वर्षीय किशोरींनी खेळाडूंनी 'करून दाखविले'. रुटाने महिलांच्या १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक जलतरण स्पर्धेत तर यानाने महिलांच्या वैयक्तिक तलवारबाजी स्पर्धेत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत पदार्पण करत असलेल्या रुटा मेलियूटाइटने १ मिनिट ०५.४७ सेकंद वेेळ नोंदवत लिथुआनिया देशाला ऑलिम्पिक इतिहासातील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्‍या अमेरिकेच्या रेबेस्सा सोनीला (१ मिनिट ०५.५५से.) यंदाही रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. १ मिनिट ०६.४६ सेकंदात ही शर्यत पूर्ण करणारी जपानची सातोमी सुजुकी कास्यपदकाची मानकरी ठरली.
 
दुसरीकडे युक्रेनच्या १५ वर्षीय याना शेमयाकिना हिने वैयक्तिक ईपी फेन्सिंग स्पर्धेतील किताबी लढतीत जर्मनीच्या ब्रिट्टा हेइडेमान हिचा ९.८ गुणांची पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 
या दोघींमध्ये थरारक लढत रंगली होती, परंतु ब्रिट्टाला शेवटी कास्य पदकावरच समाधान मानावे लागले. चीनच्या सन यूजिई हिने कास्य पदकाची कमाई केली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये लिथुआनिया देशाचा चार सदस्यीय संघ सहभागी झाला आहे. हे सर्व खेळाडू जलतरणपटू असून रुटा मेलियूटाईट ही या संघातील एकमेव महिला खेळाडू होय.
 
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास लंडन ऑलिम्पिकमध्ये थेट सुवर्णपदकालाच गवसणी घालेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. देशाला ऑलिम्पिक इतिहासातील पहिले सुवर्ण मिळवून देणे ही नक्कीच भूषणावह बाब आहे. आता हा जल्लोष कसा साजरा करायचा हेच मला समजत नाही.
 
 
 

First Published: Wednesday, August 1, 2012, 11:48


comments powered by Disqus