ज्वाला गुट्टा – अश्विनीला पुन्हा संधी? - Marathi News 24taas.com

ज्वाला गुट्टा – अश्विनीला पुन्हा संधी?

www.24taas.com, लंडन 
लंडन ऑलिम्पिकमध्येही फिक्सिंगचं भूत खेळाची पाठ सोडण्यास तयार नाही. बॅडमिंटनमध्ये जाणूनबूजून मॅच हरल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर लंडन ऑलिम्पिक समितीने आठ बॅडमिंटनपटूंना दोषी ठरवत ऑलिम्पिक बाहेरचा रस्ता दाखवलाय. त्यामुळेच भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये खेळण्याची संधी निर्माण झाली आहे.
 
या फिक्सिंगमध्ये दोन चीनच्या टीम्स तर इंडोनेशिया आणि कोरियाच्या प्रत्येकी एका टीमचा समावेश आहे. क्वार्टर फायनलमध्ये चीनचा सामना करावा लागू नये, म्हणून जपानने तैपेईविरूद्धची मॅच लीग स्टेजमध्ये मुद्दाम गमावली होती. त्यानंतर भारतीय बॅडमिंटन फेडरेशननं दक्षिण तैपई (चीन) संघ जाणून-बूझून जपानकडून हरल्याची तक्रार ऑलिम्पिक समितीकडे केली होती. या तक्रारीनंतर असोसिएशननं खेळाडूंची चौकशी केली. या चौकशीत हे खेळाडू दोषी आढळलेत. त्यामुळे फेडरेशनने या खेळाडूंना ऑलिम्पिकमधून बाहेरचा रस्ता दाखवलाय. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने केलेल्या या कारवाईमुळे आता भारतीय महिला टीम ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये निर्माण झाली आहे.
 
.

First Published: Wednesday, August 1, 2012, 18:26


comments powered by Disqus