सोढीची पातळ कढी, राखू नाही शकला आघाडी - Marathi News 24taas.com

सोढीची पातळ कढी, राखू नाही शकला आघाडी

www.24taas.com, लंडन
लंडन ऑलिंपिक, 2012 मध्ये गुरुवारी भारताला डबल ट्रैप शूटिंगमध्ये रंजन सोढी अंतिम फेरीत पोहचण्यास अपयशी ठरला. पहिल्या फेरीत त्याने ५० पैकी ४८ गुण घेऊन उत्तम सुरुवात केली होती. मात्र सोढीला दुस-या आणि तिस-या फेरीत सातत्य न राखता आल्याने दुस-या फेरीत ५० पैकी ४४ तर तिस-या आणि अंतिम फेरीत ५० पैकी केवळ ४२ गुण मिळवता आले. त्यामुळे त्याला १५० पैकी १३४ गुणावरच समाधान मानावे लागले. दुस-या व तिस-या फेरीतील खऱाब कामगिरीमुळे त्याला पहिल्या स्थानावरुन ११ व्या क्रमाकांवर जावे लागले.
 
 
भारताला डबल ट्रॅप प्रकारातून पदकाची अपेक्षा होती. या क्रीडा प्रकारात भारताला रंजनसिंग सोढी यांच्याकडून पदकाची आस लागली होती. पहिल्या फेरीनंतर सोढी पहिल्या क्रमांकावर आला होता. त्याने पहिल्या फेरीत ५० पैकी ४८ गुण घेतले. सोढी याच्याएवढेच त्याचे प्रतिस्पर्धी फ्रांसिस्को डी एनिलो, वैसिली मोजिन, पीटर रॉबर्ट रसेल यांना पहिल्या फेरीत गुण मिळाले होते. मात्र, सोढी दुस-या फेरीत ढेपाळला.
 
त्याला ५० पैकी केवळ ४४ गुण घेता आले. त्यामुळे दुस-या फेरीअखेर तो ६ व्या क्रमाकांवर फेकला गेला. तिस-या व अंतिम फेरीत त्याला किमान ५० पैकी ४८ गुण जिंकणे आवश्यक होते. मात्र दबावात आलेल्या सोढीची तिस-या फेरीत आणखीच खराब कामगिरी झाली. शेवटच्या फेरीत त्याला ५० पैकी केवळ ४२ गुण मिळवता आले.
 
त्यामुळे पहिल्या फेरीत प्रथम व दुस-या फेरीत ६ व्या क्रमाकांवर फेकल्या गेलेल्या रंजनला अखेर ११ वे स्थानावर समाधान मानावे लागले. तो जर पहिल्या ६ क्रमाकांत राहिला असता तर त्याला अंतिम फेरीत खेळता आले असते.

First Published: Thursday, August 2, 2012, 18:37


comments powered by Disqus