Last Updated: Friday, August 3, 2012, 11:32
www.24taas.com, लंडन बीजिंगमधील कांस्य पदक विजेता २६ वर्षीय विजेंदर याने गुरूवारी रात्री एक्सेल एरिनामध्ये झालेल्या सामन्यात अमेरिकन बॉक्सर टेरेल गौशा याचा १६-१५ने पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात निकाल भारताच्याच बाजूने लागला.
सामन्यामध्ये विजेंदर पहिल्याच राऊंडमध्ये एका अंकाने पुढे गेला. सुरूवातीलाच मिळालेला हा पुढाकार विजेंदरच्या विजयास उपयुक्त ठरला. दुसऱ्या राऊंडमध्ये गौशाने काही प्रमाणात चांगला मुकाबला केला. त्यामुळे दुसऱ्या राऊंडनंतर स्कोर ५-५ असा होता.
तिसऱ्या आणि शेवटच्या राऊंडमध्ये विजेंदरने अधिक आक्रमक पावित्रा घेतला. गौशाही तोडीस तोड प्रत्युत्तर देत होता. मात्र अखेर विजेंदरचाच विजय झाला. आता क्वार्टर फायनलमध्ये विजेंदरचा मुकाबला उजबेकिस्तानी बॉक्सर अबोस एतोइसशी होणार आहे.
First Published: Friday, August 3, 2012, 11:32