ऑलिम्पिक- विजय कुमारला रौप्य पदक - Marathi News 24taas.com

ऑलिम्पिक- विजय कुमारला रौप्य पदक

www.24taas.com, लंडन
भारताच्या विजय कुमारनं २५ मीटर एअर पिस्तुलच्या अंतीम फेरीत शानदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. त्याने ४० पैकी ३० निशाणे साधून दुसरे स्थान पटकावले. क्युबाच्या खेळाडूने ४० पैकी ३४ शॉटसह सुवर्णपदक पटकावले.
 
आज सकाळी विजय कुमारनं 25 मीटर एअर पिस्तुलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. विजयनं क्वालिफाय राऊंडमध्ये शानदार कामगिरी केली.  त्याने चीनच्या खेळाडूंना मागे टाकत सिव्हर मेडलवर कब्जा केला आहे.
 
गगन नारंगनंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारा विजय कुमार हा दुसरा भारतीय ठरला आहे.
 
 

First Published: Friday, August 3, 2012, 20:05


comments powered by Disqus